सोन्याच्या किंमतीत घट बघा काय आहे नवीन बाजार भाव
गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढत असलेले सोन्याची किंमत . म्हणजेच, सोने दररोज थोडं थोडं महाग होत आहे. विशेषतः गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोनं ₹1090 ने वाढलं आणि 22 कॅरेट सोनं ₹1000 ने वाढलं.
9 मार्च 2025 रोजी, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹87,860 प्रति 10 ग्रॅम होती. महाराष्ट्रातही (मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे) हीच किंमत लागू आहे.
- 22 कॅरेट सोनं: ₹80,400 प्रति 10 ग्रॅम
- 24 कॅरेट सोनं: ₹87,710 प्रति 10 ग्रॅम
ही किंमत जीएसटी (टॅक्स) आणि इतर खर्च धरून नाही. म्हणजेच आपण सोनं खरेदी करताना किंमत थोडी जास्त भरावी लागते.
सोनं महाग का होत खर आहे का
सोन्याच्या किमती वाढण्यामागे काही कारणं आहेत:
- जगात आर्थिक गोंधळ आहे – मोठ्या देशांमध्ये पैशांची अडचण आहे. लोक आपल्या पैशाचं सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे ते सोने खरेदी करत आहेत.
- बँकाही सोने खरेदी करत आहेत – अनेक देशांच्या बँका मोठ्या प्रमाणात सोने घेत आहेत. त्यामुळे मागणी वाढते आणि किंमतही वाढते.
- डॉलर कमी झाल्यास – अमेरिकेचा डॉलर कमजोर झाला तर सोने महाग होतं.
- भारतीय रुपया कमी झाल्यास – आपला रुपया कमजोर झाला की इतर देशांमधून आणलेलं सोने महाग लागतं.
- सण-उत्सव आणि लग्नसराई – भारतात सण आणि लग्नांच्या काळात लोक जास्त सोने घेतात. त्यामुळे त्याची मागणी वाढते.
चांदीही झाली महाग
फक्त सोनं नाही, चांदीही महाग झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदी ₹2100 ने वाढली आणि तिची किंमत ₹99,100 प्रति किलो झाली. चांदीचा वापर कारखान्यांमध्येही होतो, त्यामुळे तिची किंमत पुढे आणखी वाढू शकते.
Tags:
News