महिला शेतकरी उद्योजकता मेळावा – ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाकडे एक पाऊल

 महिला शेतकरी उद्योजकता मेळावा – ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाकडे एक पाऊल

agrotechnique



दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी पदव्यूत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था, चाकूर येथे "महिला शेतकरी उद्योजकता मेळावा" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने व उमेेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती, चाकूर, आदर्शिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित वडवळ (ता. निलंगा) आणि नवअस्मिता महिला शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित, चापोळी (ता. चाकूर) यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी होते प्रा. डॉ. इंद्र मणी, माननीय कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.


तत्पश्चात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या श्रीमती आशाताई भिसे, यशस्वी उद्योजिका तसेच राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे महिला शेतकरी सहभागी खूप प्रेरित झाल्या.




कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पुढील मान्यवरांची उपस्थिती लाभली:


डॉ. भगवान आसवार – संचालक, शिक्षण तथा प्रसार (कृषि), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

डॉ. विजय बेंबट – संचालक, संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

डॉ. राकेश अठावले – संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

श्रीमती कर्पनाताई थिरसागर – प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, लातूर


enterpreneurship-devlopment-program-pgiabm


तसेच विशेष उपस्थिती लाभली:


डॉ. बाळासाहेब बडे – अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, लातूर

श्री. संतोष वंगाडे – तालुका अभियान व्यवस्थापक, पंचायत समिती, चाकूर

श्री. महादेव शेलके – तालुका अभियान व्यवस्थापक, पंचायत समिती, चाकूर

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून पुढील मान्यवरांचे योगदान महत्त्वाचे ठरले:

डॉ. संतोष कांबळे – कार्यक्रम अधिकारी, पदव्यूत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था, चाकूर

श्री. सुनील राठोड – अध्यक्ष, आदर्शिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनी मर्या. वडवळ


या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना शेतीतील नवउद्योग, प्रक्रिया उद्योग, एफपीओचे फायदे आणि डिजिटल युगातील संधी याबाबत माहिती देण्यात आली. विविध प्रात्यक्षिकांद्वारे महिलांना उद्योगशीलतेकडे प्रवृत्त करण्यात आले.

कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे कार्यक्रम अधिक यशस्वी ठरला.


समारोप

महिला शेतकरी उद्योजकता मेळावा हा कार्यक्रम ग्रामीण महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला. भविष्यात अशा उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी बाळगले आहे.



enterpreneurship-devlopment-program-pgiabm




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने