सोलापूर : जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ४६ मह huसूल मंडलांचाही दुष्काळात समावेश झाला. मात्र

 सोलापूर : जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा,
सांगोला, बार्शी या पाच तालुक्यात यापूर्वीच दुष्काळ जाहीर
झाला आहे. त्यानंतर उर्वरित सहा तालुक्यातील ४६ महसूल

सोलापूर : जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा,
सांगोला, बार्शी या पाच तालुक्यात यापूर्वीच दुष्काळ जाहीर
झाला आहे. त्यानंतर उर्वरित सहा तालुक्यातील ४६ महसूल

सोलापूर : जिल्ह्यातील  सहा तालुक्यातील ४६ महसूल मंडलांचाही दुष्काळात

मंडलांचाही दुष्काळात समावेश झाला. मात्र, हवामान

स्वयंचलित यंत्रे नसल्याचा फटका नऊ महसूल मंडलांना

बसला आहे. त्या नऊ महसूल मंडलांचा दुष्काळाच्या नव

यादीतदेखील समावेश होवू शकला नाही.

 दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई


दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना

सरकारकडून हेक्टरी आर्थिक मदत दिली जाते. दुसरीकडे


पीक कर्जाचे पुनर्गठन, वीज बिलात सूट, कृषी पंप वीज

खंडित करण्याला स्थगिती, सक्तीची कर्जवसुली न करणे,

शेतसाऱ्यात सूट अशा सवलती दिल्या जातात. आर्थिक

मदतीत जिरायतीसाठी हेक्टरी साडेआठ हजार रुपये,


बागायती जमिनीसाठी १७ हजार रुपये आणि बहुवार्षि

जमिनीसाठी २२ हजार ५०० रुपयांची भरपाई दिली जाते.

जून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

मिळालेली नाही. 

तालुक्यातील एकूण पाऊस व हवामानाचा अंदाज घेण्यासाठी तेथील महसूल मंडलांमध्ये बसविलेल्या स्वयंचलित हवामान यंत्रांचा (पर्जन्यमापक) आधार घेतला जातो. सोलापूर जिल्ह्यात ९२ महसूल मंडले आहेत, पण नऊ मंडळांमध्ये ही यंत्रणाच नाही. त्यामुळे तालुक्यातील किंवा शेजारील महसूल मंडलातील पाऊस त्या मंडलांसाठी गृहीत धरला जातो. यंदा जिल्ह्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

'सकाळ'ने त्यावर सातत्याने पाठपुरावा केला आणि 'झळा दुष्काळाच्या, पण निकषामुळे पंचाईत' अशी वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे सहा तालुक्यातील ४६ महसूल मंडलांचाही दुष्काळाच्या यादीत समावेश झाला. मात्र, नऊ महसूल मंडलांमध्येदेखील दुष्काळाची दाहकता तेवढीच असतानाही दुष्काळाच्या यादीत त्यांचा समावेश नाही. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येकी एक, पंढरपूर तालुक्यातील दोन तर उत्तर सोलापूर तालुक्यातील चार महसूल मंडलांचा त्यात समावेश आहे. तेथील शेतकऱ्यांसाठी आता जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

'या' नऊ मंडलात नाही दुष्काळ

नागणसूर (अक्कलकोट), औराद (दक्षिण सोलापूर), रोपळे, खर्डी (पंढरपूर), पाटखळ (मंगळवेढा) व मजरेवाडी, बाळे, कोंडी, सोरेगाव (उत्तर सोलापूर) अशा सहा तालुक्यातील नऊ महसूल मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला नाही.





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने