Pik Vima Last Date राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे
Pik Vima Last Date राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात दुष्काळ परिस्थिती आहे अशातच आता राज्य सरकार शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा रक्कम देण्याच्या तयारीत आहे अनेक जिल्ह्यांना २५% आगाऊ पिक विमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु तुम्हाला देखील जर हे पैसे पाहिजे असतील तर शेवटची संधी आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पिक विमा भरला असेल आणि आता तुमच्या मंडळात देखील सरसकट पिक विमा रक्कम मंजूर झाली असेल तर आता सर्वांनाच हे पैसे त्यांच्या बन खात्यावर जमा केले जाणार आहेत परंतु जर शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाची ई पिक पाहणी एपद्वारे सातबारा वर नोंद केली नसेल तर मात्र अशा शेतकऱ्यांना आता पिक विम्याची रक्कम दिली जाणार नाही असे सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हीदेखील १ रु.भरून तुमच्या पिकांचा पिक विमा भरला असेल परंतु अजूनही ई पिक पाहणी द्वारे तुम्ही तुमच्या पिकाची नोंद केली नसेल तर मात्र तुम्हाला पिक विमा रक्कम मिळणार नाही एवढाच नाहीतर तुम्ही चालू वर्षाचा ७/१२ देखील काढू शकणार नाही,पिक कर्ज मिळणार नाही,शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ देखील बंद होणार आहेत.
ई पिक पाहणी २०२३ साठी आता शेवटचीच आजची मुदत देण्यात आली आहे.आज म्हणजे १५ ऑक्टोबर २०२३ नंतर जे शेतकरी पिक पाहणी नोंद करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना सर्व शेती योजना लाभ रोखण्यात येणार आहेत त्यामुळे या शेवटच्या संधीचा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा अन्यथा यावर्षीचा खरीप पिक विमा लाभ तुम्हाला मिळणार नाही.
१५ ऑक्टोबर २०२३ हि डेडलाईन आता राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी वारंवार एप्लिकेशन सर्व्हर प्रॉब्लेम आणि इतर तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंद राहिल्याचे सांगितले होते परंतु आता ३-४ वेळा शेतकऱ्यांना मुदतवाढ देवूनही शेतकऱ्यांनी जर पिक पाहणी नोंद केली नाही तर यात सरकार काहीच करू शकत नाही असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले असून आता यापुढे मुदतवाढ देखील दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
१५ ऑक्टोबर २०२३ नंतर शेतकरी आपल्या पिकांची पिक पाहणी करू शकणार नाहीत.आणि पिक पाहणी न केल्यास तुमचे क्षेत्र हे पडीक म्हणून समजले जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ तुम्हाला मिळणार नाही शेतीवर कर्ज मिळणार नाही,पिक विमा नुकसान भरपाई राक्कम मिळणार नाही शेतकरी योजनेचे अनुदान देखील दिले जाणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी करणे अनिवार्य आहे.
ई पिक पाहणी नोंद न केल्यास होणारे नुकसान –
शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पिक पाहणी नाही केली तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.यामधील काही महत्वाच्या अडचणी खालीलप्रमाणे आहेत –
चालू वर्ष (२०२३-२०२४) चा सातबारा निघणार नाही.
त्या क्षेत्रावर कोणतेही कर्ज मिळणार नाही.
पीकविमा लाभ मिळणार नाही.
नुकसान भरपाई मिळणार नाही.
क्षेत्र पडीक म्हणून ग्राह्य धरले जाईल.
अनुदान मिळणार नाही.