मागेल त्याला सोलर pump/मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत वर्गवार लाभार्थ्यांचा हिस्सा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने मध्ये सर्वसाधारण लाभार्थी आणि अनुसूचित जाती व जमाती यांनी भरावयाचा हिस्सा खालीलप्रमाणे राहील.
 
लाभार्थी3 HP पंप लाभार्थी हिस्सा5 HP पंप लाभार्थी हिस्सा7.5 HP पंप लाभार्थी हिस्सा
सर्वसाधारण लाभार्थी16,560/- रुपये (10 %)24,710/- रुपये (10%)33,455/- रुपये (10%)
अनुसूचित जाती8,280/- रुपये (5%)12,355/- रुपये (5%)16,728/- रुपये (5%)
अनुसूचित जमाती8,280/- रुपये (5%)12,355/- रुपये (5%)16,728/- रुपये (5%)

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र लाभ

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोलाची योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र सुरु केली आहे, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कमीत कमी दारात सौर कृषीपंप शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभ खालीलप्रमाणे आहेत.

  • मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे, या योजनेच्या अंतर्गत विद्युत कृषीपंपांच्या जागेवर सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • योजने अंतर्गत शासनाकडून सौर कृषी पंपांवर सबसिडी देण्यात येणार आहे, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 95 टक्के सबसिडी देणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के रक्कम भरावयाची आहे.
  • या योजनेमुळे सौर कृषी पंपांमुळे पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे
  • योजने अंतर्गत पाच एकर पर्यंत शेत जमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तीन HP पंप देण्यात येईल आणि त्यापेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच HP पंप देण्यात येणार आहे.
  • मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून 25 हजार सौर कृषिपंपांचे वितरण करण्यात येणार आहे, आणि दुसऱ्या टप्प्यात 50 हजार सौर कृषीपंपांचे वितरण केले जाईल आणि तिसऱ्या टप्प्यात शासनाकडून शेतकऱ्यांना 25 हजार सौर कृषीपंपांचे वितरण करण्यात येणार आहे.
  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र अंतर्गत  राज्यातील ज्या
    शेतकऱ्यांकडे आधीच विद्युत कनेक्शन आहे, त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सौर उर्जेवर चालणारे AG पंपांची सुविधा दिली जाणार नाही.
  • हि योजना ऑनलाइन असल्यामुळे अर्जदार या योजनेमध्ये अर्ज कधीह आणि कोठूनही करू शकतात, त्यामुळे योजनेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यामुळे अर्जदाराचा वेळ वाचेल.
  • या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे जुने डिझेल पंप बदलून त्याजागी नवे सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहे त्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संरक्षण होईल, तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेमुळे विद्युत विभागावरचा वीज वितरणाचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल.
  • मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमुळे शासनाकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या वीज अनुदानाचा शासनावरचा बोजाही कमी होण्यास मदत होईल.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल पर्यायी शेतकरी संपन्न होईल.


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र लाभार्थी पात्रता

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2024 महाराष्ट्र मोठ्याप्रमाणात राबविण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी शासनाने लाभार्थ्यांसाठी पात्रता निकष ठरवून दिलेले आहे, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे पात्रता निकष माहित असणे आवश्यक आहे, या योजनेचे पात्रता निकष खालीलप्रमाणे असतील.  

  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील, परंतु या शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसणे आवशयक आहे.
  • या योजने अंतर्गत पाच एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन HP सौर कृषी पंप आणि पाच एकरांपेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच HP सौर कृषी पंप देण्यात येतील.
  • या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसलेले शेतकरी तसेच विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत कनेक्शन मिळणे शक्य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राहील.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारी शेतजमीन असणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील.
  • योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंपांसाठी सर्वसाधारण गटांच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के आणि अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5 टक्के याप्रकारे लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे आवश्यक असेल.   


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने