पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल
पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले
हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव अलीकडे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची एका प्रकारची सणसणीच पाहायला मिळते. हा अवलिया आपला हवामान अंदाज एका मिनिटात लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअपच्या आणि youtube च्या माध्यमातून सांगत असतो.
दरम्यान अलीकडे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, वेगवेगळ्या कार्यक्रमात हवामानाचा अंदाज सांगण्याचे देखील कार्य सुरू केले आहे. दरम्यान त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत एक मोठी माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे कृष्णा उद्योग समूहाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शेतीवर हवामान बदलाचा होणारा परिणाम व हवामानावर आधारित शेती या आशयाचा शेतकरी मेळावा या उद्योग समूहाने आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी पंजाबराव डखं यांना बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान बोलतांना त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत मोठी माहिती दिली आहे. यावेळी डख यांनी एक मोठ भाकीत देखील केल आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आठ जूनला मान्सून महाराष्ट्रात येणार आहे. मात्र यावेळी फक्त मान्सूनचे आगमन होईल आणि 22 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहचेल. 27 ते 30 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असं देखील पंजाबराव डख यांनी नमूद केल आहे.